तुर्की नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी आलेल्या विमानावर आक्रमण !

सुदानी सैन्य आणि निमलष्करी दल यांच्यात संघर्ष होत असून राजधानी खार्टूम शहराला हिंसाचाराने ग्रासले आहे. आतापर्यंत शेकडो लोकांचा या संघर्षात जीव गेला असून लक्षावधी लोकांना त्यांचे घर सोडून अन्यत्र आश्रय घ्यावा लागला आहे.

शिवसेना भवनाची मालकी शिंदे गटाकडे देण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली !

शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा आणि पक्षनिधी हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

चीनमध्ये नोकरी आणि मनःशांती यांसाठी मंदिरात जाणार्‍या तरुणांच्या संख्येत वाढ !

‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे संबोधणार्‍या साम्यवाद्यांचा अड्डा असणार्‍या चीनमधील तरुणांना मंदिरात मनःशांतीसाठी जावे लागते, ही बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक !

१ मे पासून ‘शिर्डी बंद’ची हाक !

न्यायालयाच्या निर्देशानंतर साईबाबा संस्थानने केंद्रीय सुरक्षा देण्यास सिद्धता दर्शवली आहे. यामुळे ग्रामस्थांनी या विरोधात न्यायालयीन लढा देण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने निधी जमावण्यासाठी ग्रामस्थांनी भिक्षा झोळी आंदोलनही केले होते.

दारुचे व्यसन सोडवण्यासाठी व्यक्तीच्या मेंदूत बसवली ‘चीप’ !

मुळात मनुष्य व्यसनाच्या आहारीच जाऊ नये, यासाठी विज्ञानाकडे उपाय नाही ! ती क्षमता अध्यात्मात आहे. त्यासाठीे मनुष्याला साधना करणे क्रमप्राप्त आहे !

आमचे कुटुंब हे हुतात्म्याचे कुटुंब म्हणून ओळखले जाईले ! – हुतात्मा सैनिकाचे नातेवाईक

नक्षलवाद्यांच्या आक्रमणात १० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. धारातीर्थी पडलेल्या १० पैकी ८ सैनिक हे पूर्वाश्रमीचे नक्षलवादीच होते; परंतु शरणागती पत्करून ते मुख्य प्रवाहात सहभागी झाले.

‘काँग्रेसला मत देणार नाही’, असे म्हणणार्‍या तरुणाला काँग्रेसच्या नेत्याकडून मारहाण !

हिंदूंचे नेते आणि संघटना यांना ‘आतंकवादी’ म्हणणारी काँग्रेस स्वतःच आतंकवादी आहे’, असे म्हणायचे का?  

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर गुन्हा नोंदवू !

जोपर्यंत बृजभूषण शरर सिंह यांना पदावरून हटवण्यात येत नाही, त्यांना कारागृहात टाकले जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. ही लढाई केवळ गुन्हा नोंदवण्यापुरती नाही. अशा लोकांपासून खेळाला वाचवले पाहिजे.

(म्हणे) ‘भारतात जाऊन त्याच्याशी युद्ध करण्याची पाकच्या सैन्याची क्षमता !’ – पाकचे मेजर जनरल अहमद शरीफ

अशा धमक्या देणार्‍या पाकला समजेल अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक !

रशियाने युक्रेनी शहरांवर केलेल्या हवाई आक्रमणांत १३ लोक ठार !

युक्रेनी सैन्याला पाश्‍चिमात्य मित्रराष्ट्रांकडून नवे युद्ध साहित्य मिळाल्यानंतर ‘आम्ही रशियावर आक्रमण करणार’, असा सुतोवाच वोलोदिमिर झेलेंस्की यांनी केला होता. त्यानंतर रशियाने ही आक्रमणे केली.