धर्मांतर करण्यास नकार देणार्‍या हिंदु महिलेची मुसलमानाकडून हत्या !

इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विधवा असणारी हिंदु महिला चंदा सिंह हिची महंमद अरीफ आणि त्याचे कुटुंबीयांनी केली हत्या !

कौशंबी (उत्तरप्रदेश) – इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विधवा असणारी हिंदु महिला चंदा सिंह हिची महंमद अरीफ आणि त्याचे कुटुंबीय यांनी हत्या केली. अरीफ आणि त्याचे कुटुंबीय यांनी चंदा हिला मारहाण केली अन् नंतर तिचा गळा दाबला. या प्रकरणी अरीफ याला अटक करण्यात आली.

 (सौजन्य : TIMES NOW Navbharat) 

१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदा सिंह मऊ जिल्ह्यातील हळदरपूर येथे तिच्या २ मुलांसह रहात होती. तिचे पती दुर्गेश सिंह यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. ती ब्युटीपार्लर चालवून मुलांचे भरण-पोषण करत होती.

२. चंदा हिच्या नावावर १ कोटी रुपयांची संपत्ती होती. अरीफ हा ॲब्युलन्सचा चालक म्हणून काम करत होता. त्याने चंदा हिला स्वतःचे नाव गुड्डू रजपूत असे सांगितले. चंदाच्या पैशांवर डोळा ठेवून अरीफ याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. चंदा हिने मऊ येथील स्वतःची सर्व संपत्ती विकून कौशंबी येथे स्थलांतरित होण्यासाठी अरीफ याने तिच्या मागे तगादा लावला. त्यामुळे चंदा हिने सर्व संपत्ती विकून ती कौशंबी येथे मुलांसमवेत राहू लागली.

३. गुड्डू राजपूत हा मुसलमान असल्याचे लक्षात आल्यावर चंदा हिने त्याच्याशी संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला; मात्र त्यानंतर अरीफ तिला त्रास देऊ लागला. तो चंदा हिच्या मुलांवरही नमाजपठण करण्यासाठी दबाव आणू लागला. यामुळे मानसिक त्रास होऊन चंदा आजारी राहू लागली.

४. काही दिवसांपूर्वी अरीफने तिला डॉक्टरांकडे नेण्याच्या बहाण्याने स्वतःच्या गावी नेले आणि तेथे तिची हत्या केली.

संपादकीय भूमिका

अशा किती महिला जीवानिशी गेल्यावर धर्मांधांवर कारवाई केली जाणार आहे ?