शिवसेनेच्या ट्विटर हँडलचे ‘ब्ल्यू टिक’ गेले !

संकेतस्थळ बंद

मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. आता शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचे (@ShivSena) ‘ब्ल्यू टिक’ गेले असून हँडलवर क्लिक केले की, सध्या ‘रॉक अँड रोल’ असे नाव दिसत आहे. शिवसेनेचे ShivSena.in हे अधिकृत संकेतस्थळही बंद पडले आहे.

आता शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचे नाव ShivSenaUBT असे ठेवण्यात आले असून ‘शिवसेना कम्युनिकेशन’ या हँडलचे नाव ShivsenaUBTComm असे केले आहे. ठाकरे गटाचे संकेतस्थळ सध्या बंद आहे.