न्यूझीलंडमध्ये ६.१ तीव्रतेचा भूकंप

वेलिंग्टन – शहराच्या जवळ असलेल्या लोवर हट येथे भूकंपाचा तीव्र झटका जाणवला असून रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.१ एवढी नोंदवण्यात आली आहे. भूकंपानंतर कोणत्याही प्रकारची वित्तीय अथवा जीवित हानी झाल्याची माहिती प्राप्त मिळालेली नाही. सध्या न्यूझीलंडमध्ये ‘गॅब्रिएल’ नावाच्या चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळामुळे अनेक शहरांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीतून देश सावरत असतांना तेथे भूकंपाच्या रूपात आणखी एक नैसर्गिक आपत्ती उद्भवली असल्याचे बोलले जाते.