पलामू (झारखंड) येथे धर्मांध मुसलमानांकडून महाशिवरात्रीनिमित्तच्या कमानीला विरोध करत हिंसाचार !

  • मशिदीवरून हिंदूंवर दगडफेक, प्रत्युत्तरादाखल मशिदीवर दगडफेक

  • मशिदीबाहेरील दुकानांची जाळपोळ

  • घर, दुकाने, दुचाकी आदींची जाळपोळ

पलामू (झारखंड) – झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील पांकी येथील मशीद चौकामध्ये महाशिवरात्रीनिमित्त तोरणद्वार (कमान) लावण्यावरून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणामुळे येथे हिंसाचार झाला. यात घरे, दुकाने, दुचाकी आदींचा जाळपोळ करण्यासह येथे मशिदीवर दगडफेक करण्यात आली. या हिंसाचारात १८ हून अधिक लोक घायाळ झाले. यात काही पोलिसांसह उपअधीक्षक आलोक कुमार यांचाही समावेश आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

१. पांकीतील राहेवीर टेकडीवरील शिवमंदिरामध्ये प्रतिवर्षी महाशिवरात्री साजरी केली जाते. येत्या १८ फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. या अनुषंगाने मशीद चौकामध्ये तोरणद्वार बनवण्यात येणार होते. त्यासाठी साहित्य घेऊन कामगार पोचले होते. त्या वेळी मुसलमानांनी त्यांना तोरणद्वार बनवण्यापासून रोखले. त्यांचे म्हणणे होते, ‘येथे मशीद आहे त्यामुळे तोरणद्वार बनवू देणार नाही.’ (मुसलमानांचा ‘सर्वधर्मसमभाव’ ! अशा वेळी निधर्मीवादी, धर्मनिरपेक्षतावादी, पुरो(अधो)गामी कुठल्या बिळात लपलेले असतात ? – संपादक) यावरून वाद झाला. त्यानंतर कामगार तेथून परतले.

२. दुसर्‍या दिवशी सकाळी काही जण पुन्हा तोरणद्वार बनवण्यासाठी मशीद चौकात पोचले. तेव्हा मुसलमान तेथे जमा झाले. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलीस तेथे पोचले. त्यांनी दोघांमध्ये चर्चा चालू केली. या वेळी एका मुसलमानाने मंदिर समितीचे सदस्य निरंजन सिंह यांच्यावर डोक्यावर काठी मारली. यात त्यांच्या डोक्याला जखम झाल्यानंतर तेथे हिंसाचार चालू झाला. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर दगडफेक चालू झाली. मशिदीवरून दगडफेक चालू झाल्यावर मशिदीवर दगड आणि शीतपेयांच्या बाटल्या फेकण्यात आल्या. तसेच मशिदीजवळील दुकानांची जाळपोळ करण्यात आली.  यानंतर पोलिसांनी अधिक पोलीसफाटा बोलावून स्थितीवर नियंत्रण मिळवले. आता येथे कलम १४४ (जमाव बंदी) लावण्यात आले आहे. तसेच इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

झारखंडमध्ये ‘झारखंड मुक्ती मोर्चा’चे हिंदुद्वेषी सरकार असल्याने तेथे धर्मांधांचे फावले आहे आणि त्यातूनच ते अशा प्रकारची कुरापत काढत आहेत ! हिंदूंनी त्यांचे रक्षण होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना निवडून देणे आवश्यक आहे !