नांदेड येथे गोरक्षकांना अर्धनग्न करून अमानुष मारहाण !

नांदेड – येथील किनवट येथे इस्लापूर पोलीस ठाण्यात गोरक्षक युवकांना अर्धनग्न करून अमानुष मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तेथील साहाय्यक पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. गोवंशियांना हत्येसाठी नेण्यात येणार्‍या कसायांची गाडी या गोरक्षकांनी वेळीच रोखली होती. या प्रकरणी पोलिसांकडूनच गोरक्षकांना ही मारहाण करण्यात आली. (कसायांना अशा स्वरूपाची मारहाण करण्याचे पोलिसांचे कधीतरी धाडस होईल का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • नांदेडमधील या पोलिसांच्या विरोधात सर्वत्रच्या गोरक्षकांनी वेळीच संघटित होऊन आवाज उठवावा !
  • महाराष्ट्रातील तालिबानी पोलीस !