ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेकाला राणी कॅमिला कोहीनूर हिरा असलेला मुकुट घालणार नाहीत !

भारतियांच्या विरोधाचा परिणाम !

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांची पत्नी राणी कॅमिला यांनी कोहिनूर हिरा लावण्यात आलेले मुकुट घालणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. हा भारतीय समाजाच्या विरोधाचा विजय असल्याचे म्हटले जात आहे. कोहिनूर हिरा भारतातून ब्रिटिशांनी लुटून नेला होता. त्यामुळे याला पूर्वीपासूनच भारतियांकडून विरोध करत तो भारताला परत करण्याची मागणी केली जात आहे. येत्या ६ मे या दिवशी राज्याभिषेक सोहळा होणार आहे.

राणी कॅमिला यांनी आता राणी मेरीचा मुकुट धारण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरही कोहीनूरसारखा हिरा लावण्यात आला आहे; मात्र तोही ब्रिटिशांनी अन्य देशातून लुटून आणलेला आहे, असे म्हटले जात आहे.

संपादकीय भूमिका 

भारतियांनी आणि भारत सरकारने आता हा हिरा भारतात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !