जंतरमंतर (देहली) येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनातील मागणी
देहली – गुजरातमध्ये वर्ष २००२ मध्ये झालेली दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ‘बीबीसी न्यूज’ने एका माहितीपटाद्वारे खोटी माहिती प्रसारित केली आहे. वास्तविक सर्वाेच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदी यांना निर्दाेष म्हणून घोषित केले आहे. असे असतांना ‘बीबीसी’कडून भारत, हिंदु समाज आणि पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासह द्वेष पसरवत आहे. यासह बीबीसीकडून भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवणे, हिंदूंच्या सण-उत्सवांविषयी दुष्प्रचार करणे आदी अपकीर्ती केली जात आहे. त्यामुळे ‘बीबीसी न्यूज’वर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त करण्यात आली. देहलीतील जंतरमंतर १२ फेब्रुवारी या दिवशी वरील आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला अधिवक्त्या अमिता सचदेवा, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुरेश मुंजाल, नरेंद्र सुर्वे आणि सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री आदींसह अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.