परिचारिकांच्या बेमुदत काम बंदला ‘मार्ड’चा पाठिंबा !

विविध मागण्यांसाठी राज्यातील परिचारिका २८ मेपासून बेमुदत संपावर आहेत. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने चालू केलेल्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र राज्य निवासी आधुनिक वैद्यांसह केंद्रीय मार्डनेही संपाला पाठिंबा घोषित केला.

भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून भांडुप येथे आंदोलन !

या वेळी घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेतही लोकांनी सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. आंदोलनात वारकरी संप्रदाय, बजरंग दल, वज्रदल, सनातन संस्था आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

मुंबईत मराठीत नामफलक न लावणार्‍या दुकानदारांवर महापालिका कारवाई करणार !

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकाने आणि आस्थापने यांचे नामफलक ठळक मोठ्या आकारात मराठी अक्षरात ३१ मेपर्यंत करण्यात यावेत, असा आदेश महापालिकेने काढला होता; पण मुदत संपल्याने महापालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

१० रुपयांची नाणी न घेणार्‍या विक्रेत्यांविरोधात जिल्हा प्रशासनास निवेदन ! 

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक अमोल पोवार यांना निवेदन देतांना ‘रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे पालन करण्यासाठी जनजागृती करावी’, अशी विनंती करण्यात आली.

गडदुर्गांच्या दुरवस्थेसह हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना, तसेच राज्याच्या सुरक्षेसाठी गडदुर्गांची निर्मिती केली; पण सध्या गडदुर्गांची झालेली दुरवस्था आपण जाणतो. ही दुरवस्था दूर करणे, तसेच हिंदु धर्मावरील आघात रोखणे यांसाठी हिंदु राष्ट्र स्थापनेची..

आफ्रिकन नागरिक असणार्‍या माथेफिरूने केलेल्या चाकूच्या आक्रमणात अनेकजण घायाळ !

पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.

पारोळा येथील भुईकोट गडाच्या संवर्धनसाठी कृती आराखडा सिद्ध करू ! – अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव

‘संबंधित सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची पुढील सप्ताहात बैठक बोलावून त्यात कृती आराखडा निश्चित करू आणि या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधीसही बोलावू’, असे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

महाराष्ट्राला १४ सहस्र कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवाकर परतावा प्राप्त !

केंद्रशासनाकडून महाराष्ट्राला १४ सहस्र १४५ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवाकर (जी.एस्.टी.) परतावा देण्यात आला आहे. ३१ मे २०२२ पर्यंतचा हा कर परतावा आहे; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजून १५ सहस्र कोटी रुपये कर परताव्याचे बाकी असल्याचा दावा केला आहे.

हिंदूंचा वंशविच्छेद चालूच !

फुटकळ आतंकवादी अण्वस्त्रधारी देशाला भारी पडत असतील, तर हे चित्र सरकारला अत्यंत लज्जास्पद आहे. हा आतंकवाद आपण अजून कधीपर्यंत चालू देणार आहोत ? आणखी किती निरपराध हिंदूंच्या हत्या होऊ देणार आहोत ? हे सरकारला ठरवावे लागेल आणि सरकार तसे करत नसेल, तर हिंदूंनी त्यांना तसे करण्यास भाग पाडावे. ती तरी लोकशाही ठरेल !

कल्याण येथे २४ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या !

कल्याण येथील दुर्गाडी गडाजवळील रस्ता ते पत्रीपूल या भागात मोठ्या प्रमाणात मुसलमानबहुल वस्ती आहे. तेथील बराचसा भाग अनधिकृत असून मुसलमानांच्या म्हशींचे तबेले आहेत. येथून महानगरपालिकेच्या २ मुख्य जलवाहिन्या जातात.