मुंबई – मुंबईतील ज्या दुकानांवर दुकानांच्या नावाच्या पाट्या मराठीत लावण्यात आलेल्या नाहीत, त्या दुकानदारांवर मुंबई महानगरपालिकेद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकाने आणि आस्थापने यांचे नामफलक ठळक मोठ्या आकारात मराठी अक्षरात ३१ मेपर्यंत करण्यात यावेत, असा आदेश महापालिकेने काढला होता; पण मुदत संपल्याने महापालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.