१० रुपयांची नाणी न घेणार्‍या विक्रेत्यांविरोधात जिल्हा प्रशासनास निवेदन ! 

हिंदु जनजागृती समितीचे सुराज्य अभियान

अधीक्षक अमोल पोवार यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

यवतमाळ, १ जून (वार्ता.) – रिझर्व्ह बँकेचे स्पष्ट निर्देश असतांनाही १० रुपयांची नाणी न स्वीकारणार्‍या विक्रेत्यांविरोधात हिंदु जनजागृती समितीने सुराज्य अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनास निवेदन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक अमोल पोवार यांना निवेदन देतांना ‘रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे पालन करण्यासाठी जनजागृती करावी’, अशी विनंती करण्यात आली.