श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण

मुंबई, १ जून (वार्ता.) – श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे लिलावधारक आणि शासकीय अधिकारी यांच्यावर ‘सीआयडी’च्या अहवालानुसार तातडीने गुन्हे नोंद करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती, समविचारी संघटना यांच्यासमवेत भाविक आणि हिंदु धर्मप्रेमी यांच्या वतीने भांडुप (प.) रेल्वे स्थानकाजवळ १ जून या दिवशी ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ करण्यात आले.
या वेळी घेतलेल्या स्वाक्षरी मोहिमेतही लोकांनी सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. आंदोलनात वारकरी संप्रदाय, बजरंग दल, वज्रदल, सनातन संस्था आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
‘या घोटाळ्यातील भष्टाचार्यांवर कारवाई होईपर्यंत राज्यभरात आंदोलने करण्यात येतील, तसेच भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा याविरोधात सनदशीर मार्गाने लढा चालूच राहील’, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !