महाराष्ट्राला १४ सहस्र कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवाकर परतावा प्राप्त !

मुंबई – केंद्रशासनाकडून महाराष्ट्राला १४ सहस्र १४५ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवाकर (जी.एस्.टी.) परतावा देण्यात आला आहे. ३१ मे २०२२ पर्यंतचा हा कर परतावा आहे; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजून १५ सहस्र कोटी रुपये कर परताव्याचे बाकी असल्याचा दावा केला आहे. ‘महाराष्ट्राला वस्तू आणि सेवाकर परतावा मिळाला. आता राज्यात पेट्रोल आणि डिझेल यांचे दर न्यून करणार कि शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडून धन्यता मानणार ?’, असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे विचारला आहे.