ठाणे, १ जून (वार्ता.) – कल्याण येथील दुर्गाडी गडाजवळील रस्ता ते पत्रीपूल या भागात मोठ्या प्रमाणात मुसलमानबहुल वस्ती आहे. तेथील बराचसा भाग अनधिकृत असून मुसलमानांच्या म्हशींचे तबेले आहेत. येथून महानगरपालिकेच्या २ मुख्य जलवाहिन्या जातात. त्यावर जागोजागी चोरीच्या नळजोडण्या घेण्यात आल्या होत्या. पाणीपुरवठा विभागाने पोलीस बंदोबस्तात २४ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या आहेत. (जोपर्यंत मुख्य जलवाहिन्यांतून पाणी चोरणार्यांवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत पाणी चोरीच्या घटना थांबणार नाहीत ! – संपादक) ‘येथील तबेले चालकांना २४ घंटे पाणी लागते. त्यातील काही जण रात्री मुख्य जलवाहिनीला भोक पाडून चोरून नळजोडण्या घेतात. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो’, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.