|
जळगाव – जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथील भुईकोट गडाची दुरवस्था दूर करून त्याचे जतन करावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने, तसेच पारोळा येथील शिवसेना आमदार श्री. चिमणराव पाटील यांच्या साहाय्याने जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची १ जून या दिवशी भेट घेण्यात आली. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, सौ. क्षिप्रा जुवेकर, समितीचे सर्वश्री प्रशांत जुवेकर, निखिल कदम उपस्थित होते. ‘संबंधित सर्व विभागाच्या अधिकार्यांची पुढील सप्ताहात बैठक बोलावून त्यात कृती आराखडा निश्चित करू आणि या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधीसही बोलावू’, असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले.
राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या गडाच्या संदर्भात आतापर्यंत झालेला पत्रव्यवहार, तसेच माहितीच्या अधिकारातून मिळालेली कागदपत्रे जिल्हाधिकार्यांना देण्यात आली. आमदार चिमणराव पाटील यांनीही ‘गडाची स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलायला हवीत’, असे सांगितले.
आध्यात्मिक अधिष्ठान असलेले लोक असल्यास कार्याला गती येते ! – जिल्हाधिकारी अभिजित राऊतया भेटीत ‘सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांना पाहून असे आध्यात्मिक अधिष्ठान असलेले लोक असल्याने कार्याला गती येते’, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी उत्स्फूर्तपणे काढले. |