जम्मूमध्ये २ आतंकवादी ठार, तर १ सैनिक वीरगतीला प्राप्त !

जम्मू येथील भिठंडी भागात जिहादी आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले, तर १ सैनिक वीरगतीला प्राप्त झाला. या चकमकीत ८ सैनिक घायाळ झाले.

(म्हणे) ‘जामा मशिदीमध्ये जलाभिषेक करण्याचा प्रयत्न केला, तर रक्तपात होईल !’

जर जामा मशिदीमध्ये शिवमंदिर असल्याचा दावा करण्यात येत आहे, तर पोलीस, प्रशासन, तसेच पुरातत्व विभाग यांनी तेथे जाऊन याची पडताळणी करणे आवश्यक आहे !

पलक्कड (केरळ) येथे संघ स्वयंसेवकाच्या हत्येच्या प्रकरणी पीएफ्आय आणि एसडीपीआय यांच्या ४ कार्यकर्त्यांना अटक

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी कधी घातली जाणार ?

कांडला बंदराजवळून २ सहस्र कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

उत्तराखंडमधील एका आस्थापनाने इराणमधून मागवलेल्या साहित्याच्या कंटेनरमध्ये हे हेरॉईन सापडले आहे.

अलवर (राजस्थान) येथे ३०० वर्षे जुने शिवमंदिर अनधिकृत ठरवून पाडले !

देहलीतील जहांगीरपुरी येथील धर्मांधांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्यावर धावून जाणारे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते काँग्रेसच्या राज्यात हिंदूंचे जुने मंदिर पाडल्यावर गप्प का आहेत ?

बेंगळुरू येथील आध्यात्मिक गुरु प्राध्यापक व्ही. रंगराजन यांना ‘डॉक्टरेट’ प्रदान !

परोपकार, नेतृत्व, उच्च शिक्षण, धार्मिक परंपरांना चालना या क्षेत्रांमधील महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद घेऊन प्राध्यापक व्ही. रंगराजन यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे.

भारतीय चिकित्सा पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आयुष मार्क’चे उद्घाटन ! – पंतप्रधान मोदी

‘आयुष मार्क’ असलेली उत्पादने जागतिक समुदायाला आश्‍वस्त करतील की, ते गुणवत्तायुक्त उत्पादने वापरत आहेत. ‘हील इन इंडिया’ (भारतात येऊन निरोगी व्हा) ही मोहीम या दशकात सर्वदूर प्रसिद्ध होईल !

धार्मिक कार्यक्रमांसाठी देशपातळीवर नियमावली करायला हवी ! –  रा.स्व. संघाची मागणी

धर्मावरून चालू असलेले राजकारण चुकीचे असून प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाने घटनेच्या अधीन राहून नियमांचे पालन करावे. धार्मिक रितीरिवाज, परंपरा, अभिव्यक्तींसाठी देशपातळीवर नियमावली करायला हवी.

भारताला हिंदु राष्ट्र करणे, ही काळाची आवश्यकता ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदू’

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड-बंगाल येथे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन

राज्यातील आंदोलनाचे सर्व खटले २ आठवड्यांत निकाली काढा ! – संभाजीनगर खंडपिठाचा आदेश

राज्यातील विविध सामाजिक आणि राजकीय पक्ष, संघटना यांनी केलेली आंदोलने, तसेच मोर्चांचे खटले ज्यात जीवितहानी झालेली नाही अन् ५ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली नाही, असे खटले..