कांडला (गुजरात) – येथील बंदराजवळून आतंकवादविरोधी पथक आणि महसूल गुप्तचर संचालनालय यांनी धाड टाकून ३५० किलो हेरॉईन जप्त केली. याचे आंतरराष्ट्रीय बाजारात २ सहस्र कोटी रुपये मूल्य आहे. उत्तराखंडमधील एका आस्थापनाने इराणमधून मागवलेल्या साहित्याच्या कंटेनरमध्ये हे हेरॉईन सापडले आहे. या आस्थापनेची आता चौकशी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी गुजरातच्या मुंदरा बंदरातून २१ सहस्र कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते.
कांडला बंदरगाह से 1,300 करोड़ रुपये की 260 किलोग्राम हेरोइन जब्त https://t.co/hkpUCYTeaQ
— Janta Se Rishta News | जनता से रिश्ता न्यूज़ (@jantaserishta) April 21, 2022