चीनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेमुळे घातलेल्या निर्बधांच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन

बीजिंग (चीन) – कोरोनावर मात करण्यासाठी चीनने जगातील सर्वांत कठोर ‘झिरो कोविड पॉलिसी’ (कोरोनाच्या उच्चाटनाचे धोरण) लागू केली आहे. यासाठी चीनने मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या चाचण्या घेणे चालू केले आहे. देशात अनेक ठिकाणी कठोर दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे.

या विरोधात चीनच्या शेनझेन शहरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. दिवसेंदिवस लांबत चाललेल्या या दळणवळण बंदीच्या विरोधात नागरिक आंदोलन करत आहेत. नागरिकांना अन्नधान्य पुरवठ्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. व्यवसाय बंद असतांना अनेकांसमोर ‘घराचे भाडे कसे देणार ?’ असा प्रश्‍न पडला आहे. त्यामुळे नागरिकांनी दळणवळण बंदी मागे घेण्याची आग्रही मागणी केली आहे.