सागर (मध्यप्रदेश) येथील केंद्रीय विश्‍वविद्यालयात मुसलमान विद्यार्थिनीचे हिजाब घालून वर्गातच नमाजपठण !

‘हिंदु जागरण मंच’ची कारवाईची मागणी

  • आता कुणीही ‘शिक्षणाचे इस्लामीकरण’ होत असल्याची ओरड करणार नाही, उलट हे ‘मुसलमान विद्यार्थिनीचे धार्मिक स्वातंत्र्य आहे’, असे म्हणतील, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • अशा कट्टरतावाद्यांच्या या कृतींविषयी बुद्धीवादी, साम्यवादी, निधर्मी आदी नेहमी मौन बाळगतात, हे लक्षात घ्या ! – संपादक

सागर (मध्यप्रदेश) – येथील डॉ. हरिसिंह गौर केंद्रीय विश्‍वविद्यालयातील ‘बी.एस्.सी. बीएड्.’च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीने वर्गात हिजाब घालून नमाजपठण केले. यावर ‘हिंदु जागरण मंच’ने आक्षेप घेत तिच्यावर कारवाईची मागणी केली.

हिंदु जागरण मंचच्या सागर जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश सराफ यांनी विद्यापिठाच्या कुलगुरु निलिमा गुप्ता आणि निबंधक संतोष सहगोरा यांच्याकडे याविषयी तक्रार प्रविष्ट केली. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी चालू केली आहे.