बीरभूम (बंगाल) येथे २०० हून अधिक गावठी बाँब जप्त !

  • राज्यात प्रत्येक हिंसाचाराच्या वेळी गावठी बाँबचा वापर आतापर्यंत होत आला असतांना ‘ते कुठे बनवले जातात आणि कोण बनवतात ?’, याचा शोध पोलीस का घेत नाहीत ? आता पुन्हा हिंसाचार झाल्यावर पोलीस जागे झाले आणि त्यांनी कारवाई केली. ही कारवाई आधीच का केली नाही ? राज्यातील पोलीस झोपलेले असतात का ? – संपादक
  • बंगाल हा गावठी बाँबनिर्मितीचा कारखाना झाला असून ही स्थिती पालटण्यासाठी तेथे राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य ! – संपादक

बीरभूम (बंगाल) – येथे काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसचे पंचायत सदस्य भादू शेख यांच्यावर बाँब फेकून त्यांची हत्या करण्यात आल्यावर ८ जणांना जिवंत जाळण्यात आले होते. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांना संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी २०० हून अधिक गावठी बाँब जप्त केले आहेत.

तसेच राज्यातील पश्‍चिम बर्दवान जिल्ह्यातील सालानपूरमध्ये पोलिसांनी शस्त्रे बनवणार्‍या कारखान्यावर धाड टाकून मोठ्या संख्येने बाँब जप्त केले.