श्रीलंकेकडून भारताच्या १६ मासेमारांना अटक !

सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप

भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, हे मासेमारांना लक्षात येण्यासाठी भारत सरकारने पाक आणि श्रीलंका यांच्या सागरी सीमेजवळ व्यवस्था करणे आवश्यक आहे. गेली अनेक वर्षे ही समस्या भारतीय मासेमारांना येत असूनही त्यावर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी काहीच उपाययोजना न काढणे लज्जास्पदच होय ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

कोलंबो (श्रीलंका) – सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत श्रीलंकेच्या नौदलाने भारताच्या १६ मासेमार्‍यांना अटक केली. त्यांच्या २ यांत्रिक नौकाही जप्त करण्यात आल्या आहेत. हे सर्व मासेमार तमिळनाडू राज्यातील आहेत.

गेल्या मासातही श्रीलंकेच्या नौदलाने काही भारतीय मासेमारांना अटक केली होती; मात्र भारत सरकारने कठोर भूमिका घेतल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.