पाकने त्याच्या संपूर्ण शक्तीचा वापर केला, तरी तो भारतासमोर टिकणार नाही, हे त्याने कायमच लक्षात ठेवायला हवे ! – संपादक
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान एक उत्तरदायी अण्वस्त्रधारी देश आहे; मात्र जर आमच्यावर आक्रमण झाले, तर आम्ही संपूर्ण शक्तीनिशी उत्तर देऊ, असे विधान पाकचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पाकच्या ‘पाकिस्तान दिना’निमित्त बोलतांना केले. २३ मार्च १९४० या दिवशी पहिल्यांदा इंग्रजांसमोर ऑल इंडिया मुस्लिम लीगने मुसलमानांसाठी स्वतंत्र देश बनवण्याची मागणी केली होती. त्यामुळे पाकिस्तान हा दिवस ‘पाकिस्तान दिन’ म्हणून साजरा करतो.
Pakistan is a responsible #NuclearPower but it will not hesitate to retaliate with ”full force” if attacked, President @ArifAlvi said as he reaffirmed the resolve to make his country economically stronger and prosperous.#ArifAlvi #Pakistan https://t.co/XCSqvYBPPm
— DT Next (@dt_next) March 23, 2022
राष्ट्रपती अल्वी पुढे म्हणाले की, आम्ही सर्वांकडून शांततेची अपेक्षा करतो. आम्ही इतरांच्या सार्वभौमत्त्वाचा सन्मान करतो; मात्र आम्ही आमच्या स्वातंत्र्याशी कोणतीही तडजोड करणार नाही.