रशियन नागरिकांच्या जीवनावश्यक खर्चात १४ टक्क्यांनी वाढ !

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून जगभरातील प्रमुख देशांनी रशियावर अनेक प्रतिबंध लादले आहेत, तसेच रशियाला युद्धावर प्रचंड प्रमाणात खर्चही करावा लागत आहे. त्यामुळे रशियन नागरिकांच्या जीवनावश्यक खर्चात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध हिलसाँग चर्चचे संस्थापक आणि प्रमुख ब्रायन हाऊस्टन यांना अश्‍लील वर्तनामुळे पदावरून हटवले !

धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली भारतीय प्रसारमाध्यमे अशा बातम्या दडपतात, हे लक्षात घ्या !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत युक्रेनविषयीच्या रशियाच्या प्रारूपावरील मतदानात भारत तटस्थ

चीनने या प्रारूपास पाठिंबा दिला. दुसरीकडे इस्रायलने रशियाची भीती दाखवून ‘पेगासस’ हे गुप्तचर ‘सॉप्टवेअर’ युक्रेनला देण्यास नकार दिला आहे.

साळगाव येथे नायजेरियाच्या नागरिकाकडून ६७ लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

अमली पदार्थविरोधी पथकाने २३ मार्च या दिवशी साळगाव येथील एका मद्यालयावर धाड टाकून नायजेरियाचा नागरिक ओनये लकी याच्याकडून ६६ लक्ष ९५ सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले.

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) टपाल कार्यालयाची १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक

आतापर्यंत विश्‍वासार्ह वाटणार्‍या टपाल खात्यातही भ्रष्टाचार होऊ लागल्याने सर्वसामान्य जनतेने गुंतवणूक कुठे करावी ? हा प्रश्‍न निर्माण होत आहे !

काश्मिरी हिंदू, दलित आदींवर झालेल्या अत्याचारांमागील सत्य समोर आणण्यासाठी आयोगाची स्थापना करावी ! – भाजपच्या खासदाराची लोकसभेत मागणी

अशी मागणी करण्याची वेळ का येते ? स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांत सत्तेत असलेल्या सर्वपक्षीय सरकारांनी अशी चौकशी का केली नाही ? केंद्र सरकारने वेळ न दवडता अशा प्रकारची समिती स्थापन करून सत्य समोर आणावेे !

काहीही झाले तरी त्यागपत्र देणार नाही ! – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात पाकच्या संसदेमध्ये अविश्‍वास ठराव आणण्यात आला आहे. त्यावर २५ ते २८ मार्च या काळात मतदान होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खान बोलत होते.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या, तर नगरसेविकेला गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचीच सत्ता असतांना तेथे या पक्षाचे कार्यकर्तेच सुरक्षित नसतील, तर ‘सामान्य जनता कशी जगत असेल ?’, याचा विचारही न केलेला बरा !

‘सनातन प्रभात’च्या ज्ञानशक्तीचा परिपूर्ण लाभ घ्या !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश – जगातील कुठल्याही नियतकालिकामध्ये असे अध्यात्म शिकवणारे लेखन उपलब्ध होणार नाही. ‘सनातन प्रभात’मधील ‘साधना’ आणि ‘अध्यात्म’ या विषयांच्या लेखांचे नियमित वाचन केल्यास वाचकांमध्ये निश्चितच आध्यात्मिक दृष्टी आणि साधकत्व निर्माण होईल !

संतांनी समष्टी प्रसारकार्य करण्यामागील कारण !

‘आधीच्या युगांत प्रजा सात्त्विक असल्याने ऋषींना समष्टी प्रसारकार्य करावे लागायचे नाही. आता कलियुगात बहुतेक साधना करत नसल्याने संतांना समष्टी प्रसारकार्य करावे लागते !’