उत्तर कोरियाकडून १ सहस्र १०० किलोमीटर पल्ला गाठणार्‍या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी !

सियोल (दक्षिण कोरिया) – उत्तर कोरियाने वर्ष २०१७ नंतर प्रथमच ‘इंटरकॉन्टिनेन्टल (आंतरखंडीय) बॅलिस्टिक मिसाइल’ची चाचणी केल्याचा दावा दक्षिण कोरिया आणि जपान यांनी केला आहे. हे क्षेपणास्त्र तब्बल ६ सहस्र किलोमीटर उंचीपर्यंत गेले, तसेच ते १ सहस्र १०० किलोमीटरचा पल्ला गाठून जपानी समुद्रामध्ये पडले. उत्तर कोरियाकडे ८ सहस्र किलोमीटर उंची गाठू शकणारी क्षेपणास्त्रेही आहेत. या क्षमतेची क्षेपणास्त्रे केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या देशांकडेच आहेत, असे बीबीसीने प्रकाशित केलेल्या वृत्तात म्हटले आहे. क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते आकाशात जेवढी अधिक उंची गाठेल, तेवढा दूरचा पल्ला गाठते, असे गणित असते.