उत्तराखंडमधील पिथौरागढमार्गे थेट कैलास मानसरोवरपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवणार !
यासाठी स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांपर्यंत वाट पहावी लागणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक
नवी देहली – आता कैलास मानसरोवर यात्रेला नेपाळ किंवा चीन या देशांतून जावे लागणार नाही, तर उत्तराखंडमधील पिथौरागढ येथून थेट कैलास मानसरोवरपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवण्यात येणार आहे. तो वर्ष २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली.
Indians will be able to reach #Mansarovar from #Pithoragarh by 2023 end: Union Minister #NitinGadkarihttps://t.co/FG0ntIxyDF
— India TV (@indiatvnews) March 23, 2022
गडकरी पुढे म्हणाले की, चीनच्या सीमेला जोडणारा आणि सैनिकी दृष्टीने महत्त्वाचा असलेला घट्टाबगड-लिपुलेख हा मार्ग २ वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. या मार्गामुळे मानसरोवर येथे जाणारे भाविक, तसेच सर्वसामान्य नागरिक आणि सुरक्षादल यांना या मार्गावरून प्रवास करता येणार आहे. पूर्वी सैन्याला सीमेपर्यंत रसद घेऊन जाण्यासाठी ४ दिवस लागत होते, आता या मार्गामुळे ते केवळ ४ घंट्यात सीमेपर्यंत पोचू शकणार आहेत.