संस्कृतीचे पालन आणि धर्माचरण केल्यास खर्‍या अर्थाने स्त्रिया सक्षम आणि सुरक्षित होऊ शकतात ! – श्रीमती अलका व्हनमारे, महिला संघटक, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा

जेथे महिलांचा सन्मान होतो, तेथे देवी-देवता वास करतात, त्यामुळे भारतीय संस्कृतीचे पालन आणि धर्माचरण केल्यास खर्‍या अर्थाने स्त्रिया सक्षम अन् सुरक्षित होऊ शकतात.

जगभरात कोरोना महामारीचे १ कोटी ८२ लाख बळी ! – संशोधन

जागतिक स्तरावर बळी पडलेल्या ५९ लाख या एकूण मृतांच्या संख्येपेक्षा तीन पटींनी अधिक लोक मृत्यूमुखी पडले असल्याचे मत वॉशिंग्टन विद्यापिठातील संशोधकांच्या एका गटाने व्यक्त केले आहे.

अमेरिकेतील पाकचे राजदूत मसूद खान यांचे आतंकवाद्यांशी संबंध असल्याने त्यांची नियुक्ती रहित करा ! – अमेरिकेतील ३ खासदार आणि अ‍ॅटर्नी जनरल यांची मागणी

अशी मागणी का करावी लागते  ? अमेरिकेच्या प्रशासनाला आणि अन्वेषण यंत्रणांना हे लक्षात येत नाही का ? कि पाकप्रेमामुळे ते असे करण्यास कचरत आहेत ?

आसामच्या खासगी मदरशांमध्ये आतंकवादी सिद्ध केले जात आहेत ! – भाजपचा आरोप

आसामध्ये भाजपचेच सरकार असतांना भाजपने अशा मदरशांची चौकशी करून त्यात ते दोषी आढळले, तर त्यांवर बंदी घातली पाहिजे !

होळी आणि रंगपंचमी या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांना आळा घाला !

रंगपंचमीला स्त्रियांवर रंग उडवणे, त्यांची छेड काढणे, त्यांच्याकडे पाहून अश्लील अंगविक्षेप करणे, घाणेरड्या पाण्याचे फुगे मारणे; तसेच आरोग्याला घातक असणारे रंग फासणे असे अपप्रकार वाढत चालले आहेत.

५ राज्यांमधील दारूण पराभवानंतर काँग्रेसच्या ‘जी-२३’ गटाच्या नेत्यांनी बोलवली बैठक !

घराणेशाही, हिंदुद्वेष, राष्ट्राघातकी निर्णय, मुसलमानांचे अतीलांगूलचालन यांमुळे काँग्रेस आता संपण्याच्या मार्गावर आहे. हे काँग्रेसच्या नेत्यांना आता लक्षात येत असले, तरी हे एक वास्तव आहे. ते आता कुणीही पालटू शकत नाही, हे त्यांनी स्वीकारयला हवे !

तिबेटमध्ये नववर्षाच्या निमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमांवर चीनने घातली बंदी !

चीनची दादागिरी ! चीन एकेक देश गिळंकृत करून त्याची सांस्कृतिक ओळख कशा प्रकारे पुसून टाकतो, हे यावरून दिसून येते !

काँग्रेस पक्ष तृणमूल काँग्रेस पक्षात विलीन करण्याची हीच योग्य वेळ ! – तृणमूल काँग्रेस

हिंदूंच्या दृष्टीने हे दोन्ही हिंदुद्वेषी असल्याने त्यांचा राजकीयदृष्ट्या अस्त होणेच योग्य आहे !

‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याच्या प्रस्तावास मान्यता न दिल्याने विरोधकांचा विधानसभेत गदारोळ !

‘औरंगाबाद’चे नामकरण ‘संभाजीनगर’ करणे याची मूळ कल्पना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे.

काँग्रेसला मरणपंथाला लागलेले पहावत नाही ! – गुलाम नबी आझाद

मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी राष्ट्रघातकी निर्णय घेतले, त्या पक्षाचे अधःपतन निश्‍चित होते ! काँग्रेसचे अधःपतन पहाण्याची नामुष्की काँग्रेसवाल्यांवर आली आहे. त्यासाठी त्यांनी सिद्ध रहावे !