|
हाँगकाँग – तिबेटमध्ये तिबेटी नववर्ष ‘लोसर’च्या प्रीत्यर्थ अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. चीनने तिबेटची राजधानी ल्हासा आणि त्याच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये ‘लोसर’च्या निमित्ताने आयोजित करण्यात येणार्या धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे तिबेटी लोकांना नववर्ष साजरा करण्यावर अडथळे येणार आहेत. मागील वर्षीही चीनने कोरोना महामारीचे कारण पुढे करत ‘लोसर’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. या वेळी ‘कार्यक्रम आयोजित करणार्या संबंधितांना कठोर दंड देण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
चीन तिब्बत में लगातार अपनी दमनकारी नीतियों से बाज नहीं आता.#China https://t.co/yKb0hHF6jK
— Zee News (@ZeeNews) March 11, 2022
तिबेटी लोकांच्या धार्मिक कार्यक्रमांवर अशा प्रकारे निर्बंध घालून तेथील तिबेटी संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे ‘हाँगकाँग पोस्ट’ने म्हटले आहे. ‘प्रशासनात काम करणार्या तिबेटी लोकांना या दिवशी कामाच्या ठिकाणी उपस्थित रहाण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यांनी सुटी घेऊन हा सण साजरा करू नये, यासाठी असे करण्यात आले आहे, असे हाँगकाँग पोस्टने म्हटले आहे.