शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांच्या उपस्थित केलेल्या सूत्रावरून विधानसभेत विरोधकांचा गदारोळ !

चर्चा करून जनतेचे प्रश्‍न सोडवण्यापेक्षा गोंधळ घालून सभागृहाचा वेळ आणि जनतेचा पैसा वाया घालवणारे लोकप्रतिनिधी जनहित काय साधणार ? हेच दिसून येते !

राज्यातील मंत्र्यांना अडकवण्याचा प्रयत्न; अधिवेशन संपण्यापूर्वी ‘पेनड्राईव्ह’ देणार ! – शशिकांत शिंदे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

जनतेने निवडून दिलेल्या एका लोकप्रतिनिधीनेच लोकशाहीची वस्तुस्थिती मांडून लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. अशी लोकशाही जनतेचे हित कसे साधणार ?

‘पेनड्राईव्ह’मधून सादर केलेल्या पुराव्यांची चौकशी झाली नाही, तर न्यायालयात जाऊ ! – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

८ मार्च या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:वरील आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात होत असलेल्या षड्यंत्राच्या पुराव्यांचा ‘पेनड्राईव्ह’ विधानसभेत सादर केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पुराव्यांची सत्यता पडताळली जाईल ! – सतेज पाटील, गृहराज्यमंत्री

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आरोप करून दिलेल्या पुराव्याची सत्यता पडताळण्याचे काम गृह विभागाकडून चालू आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ९ मार्च या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना दिली.

विधानसभेच्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला आक्षेप घेणारी भाजपचे आमदार गिरीश महाजन यांची याचिका न्यायालयाने फेटाळली !

‘महाराष्ट्राचे सध्याचे दुर्दैव असे की, राज्यपाल आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या सोबत नाहीत. त्यांच्या या वादात हानी कुणाची होत आहे ?’, असा प्रश्‍नही न्यायालयाने उपस्थित केला.

(म्हणे) ‘भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा !’

के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगाणा राष्ट्र समिती हा पक्ष मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानतो आणि हिंदूंना नेहमीच दुय्यम स्थान देतो. अशांना भगवा ध्वज खुपल्यास आश्‍चर्य ते काय ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीबद्दल थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

न्यायालयाचा निकाल डावलून धर्मांध विद्यार्थिनींनी हिजाब घालून परीक्षा दिली !

न्यायालयाचा आदेश डावलणार्‍या कायदाद्रोही धर्मांध विद्यार्थिनींनीही भविष्यात कायदा हातात घेऊन समाजाची शांतता भंग केल्यास आश्चर्य वाटणार नाही !

जम्मूच्या उधमपूर येथील बाँबस्फोटात १ ठार, १५ घायाळ !

प्राथमिक माहितीनुसार हा स्फोट ‘आयईडी’मुळे झाला असून यामागे आतंकवादी संघटनांचा हात नसल्याचे पोलीस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींना तातडीने पत्र पाठवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही !

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, यासाठी विधान परिषद सभापती यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समवेत विधानभवन येथे बैठक झाली.