
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आरोप करून दिलेल्या पुराव्याची सत्यता पडताळण्याचे काम गृह विभागाकडून चालू आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ९ मार्च या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना दिली.
ते पुढे म्हणाले की, विशेष सरकारी अधिवक्ता यांच्या कार्यालयात अथवा घरात लावण्यात आलेला कॅमेरा कुणी लावला ? कॅमेरा लावण्यामागचे उद्दिष्ट काय होते ? याविषयी चौकशी केली जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारवर एवढा गंभीर आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे; मात्र आरोप करतांना १ बोट सरकारकडे असले, तरी उरलेली ४ बोटे भाजपकडे आहेत. यापूर्वीही ‘फोन टॅपिंग’ करून काही नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला गेला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे ही प्रकरणे बाहेर येत आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !