विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांविषयी आज ‘दूध का दूध, पानी का पानी’ करणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत सरकारवर गंभीर आरोप करत ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सादर केली होती.

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करावी ! – आशिष शेलार

फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा कटही उलगडला आहे. हा महाभयंकर कट दिसत असल्याने फडणवीस यांची सुरक्षा तात्काळ वाढवावी. फडणवीस यांनी सादर केलेले पुरावे ज्या कटाविषयी होते, त्या कटाचे सूत्रधार विशेष सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण आहेत

महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ वाढवून राष्ट्र अन् धर्म रक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती

‘सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज युवती मंडळ स्वारगेट, पुणे’ या संघटनेच्या वतीने जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

मोखाडा (पालघर) येथील शववाहिका चालकावर कारवाई ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

नगरपालिकेने शववाहिनी उपलब्ध करून देणे, हे त्यांचे कर्तव्य आहे; परंतु राज्यातील बर्‍याच नगरपालिका, परिषदा अशी व्यवस्था करत नाही, असाही खुलासा त्यांनी केला.

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विरोधकांचा विधान परिषदेतून सभात्याग !

विधान परिषदेत तारांकित प्रश्‍नाच्या तासिकेपूर्वी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांच्या त्यागपत्राची मागणी केली.

सरकार भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून लक्ष्य करत आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेनड्राईव्हद्वारे पुरावे सादर केले !

विधानभवनातील बैठकीत एस्.टी.च्या संपाविषयी सकारात्मक चर्चा !

१० मार्च या दिवशी सकाळी १० वाजता विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर या बैठकीतून निघालेल्या तोडग्याविषयी सभागृहात माहिती देणार आहेत, तसेच त्यांच्या निर्देशानुसार एस्.टी. संपाविषयी आमदारांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

वानवडी (जिल्हा पुणे) येथे इसिसशी संबंधांच्या संशयावरून ‘एन्.आय.ए.’कडून एका धर्मांधाच्या घरी धाड, ४ धर्मांधांना अटक !

‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करते. ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणारे निधर्मी, साम्यवादी आणि काँग्रेसी यांना आता काय म्हणायचे आहे ?

विधानसभेत निलंबित केलेले १२ आमदार कोणत्या नियमाच्या आधारे सभागृहात उपस्थित रहातात ? – काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांचा प्रश्‍न  

त्यांना अनुमती कुणी दिली ? अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी ९ मार्च या दिवशी विधानसभेत केली.

पवारसाहेब हेच ‘दाऊदचा माणूस’ असू शकतात ! – आमदार नीतेश राणे, भाजप

पवारसाहेब हेच दाऊदचा माणूस असू शकतात, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी ९ मार्च या दिवशी ‘ट्वीट’ करून केला आहे.