ख्रिस्ती प्रचारकाला साहाय्य करणारे २ आरोपी अटकेत : ख्रिस्ती प्रचारक पसार
देशात प्रतिदिन सहस्रो हिंदूंचे धर्मांतर होत असतांना सर्वत्र धर्मांतरविरोधी कायदा न करणे, हे अप्रत्यक्षपणे धर्मांतराला हातभार लावण्यासारखे नव्हे का ? हिंदूंनीही संघटितपणे हा कायदा लवकरात लवकर करण्याची मागणी केली पाहिजे ! – संपादक
खरगोन (मध्यप्रदेश) – येथे ३ नोव्हेंबर २०२१ या दिवशी २२ लोकांनी धर्मांतर करून ख्रिस्ती पंथ स्वीकारला होता, त्यांनी हिंदु धर्मामध्ये पुन्हा प्रवेश करून ‘घरवापसी’ केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत रसगाव मालपुरा येथील गावकरी विजय बडोले आणि त्याची आत्या बंजुला बडोले यांना अटक केली. या दोघांच्या साहाय्यानेच अरुणाचल प्रदेशातून आलेला ख्रिस्ती प्रचारक मारसन लाय याने २२ जणांचे धर्मांतर केले होते. मारसन लाय हा पसार झाला. धर्मांतरासाठी मारसन याने गावातील मुलांना विनामूल्य शिक्षण देण्यासह विविध आमिषे स्थानिक लोकांना दाखवली होती. धर्मांतर करतांना त्याने २२ लोकांवर पाणी शिंपडून त्यांच्या गळ्यात ‘क्रॉस’ (ख्रिस्त्यांचे धार्मिक चिन्ह) घातला होता.
22 लोगों को धर्मांतरित कर बनाया गया था ईसाई….. जय श्री राम के उद्घोष के साथ सबकी कराई गई घर वापसी
https://t.co/3WDNw3lZmb— Sudarshan News (@SudarshanNewsTV) November 25, 2021
धर्मांतराच्या या घटनेची चित्रफीत माध्यमांवर प्रसारित झाली होती. यानंतर भाजपचे खासदार गजेंद्र सिंह पटेल यांनी खरगोनच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांनीवरील कारवाई केली.