करीना कपूर हिने बायबलचे नाव ‘प्रेग्नसी बायबल’ पुस्तकासाठी वापरल्याने बीड आणि सांगली येथे ख्रिस्त्यांकडून पोलिसांत तक्रार !
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री करीना कपूर हिने ख्रिस्ती पंथियांच्या ‘बायबल’चे नाव ‘प्रेग्नसी बायबल’ या पुस्तकासाठी वापरल्यामुळे आक्षेप घेण्यात आला आहे.
हेमांगी कवी यांच्या ‘पोस्ट’चा विषय शिर्डी देवस्थानमधील वस्त्रसंहितेशी जोडून मंदिर प्रवेशाच्या संदर्भात महिलांवर अन्याय होत असल्याचा तृप्ती देसाई यांचा कांगावा !
महिलांना अंतर्वस्त्र परिधान करण्याच्या संदर्भात स्वायत्तता असल्याविषयी अभिनेत्री हेमांगी कवी यांनी केलेल्या उथळ ‘पोस्ट’ला सामाजिक माध्यमांत वारेमाप प्रसिद्धी !
गरिबांचे दाखले, शेतकर्यांचे उतारे वेळेत द्या आणि नागरिकांना विनाकारण त्रास देऊ नका ! – राजू यादव, शिवसेना
शिवसेना जसे चांगल्या कामाचे कौतुक करते, तसे नागरिकांना त्रास दिल्यास धडाही शिकवते, अशी चेतावणी राजू यादव यांनी दिली.
राष्ट्रीय वारकरी परिषद सिद्ध करत असलेले ‘शिवचरित्र’ पारायण प्रत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उपयुक्त ! – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय
छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र संस्कृत श्लोक आणि प्राकृत ओवी स्वरूपात (पारायण प्रत) राष्ट्रीय वारकरी परिषदेने संकलित केले आहे. हे कार्य महत्त्वाचे असून हिंदु समाजाला दिशा देणारे आणि भारतातील सर्व समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. या कार्यासाठी राष्ट्रीय वारकरी परिषदेवर पांडुरंगाची कृपा आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी मुंबई येथून २ सहस्र २०० जादा ‘एस्.टी.’ गाड्यांची सोय !
१० सप्टेंबरपासून चालू होणार्या गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून कोकणासाठी २ सहस्र २०० ‘एस्.टी.’ गाड्या सोडण्यात येणार आहेत. १६ जुलैपासून ‘एस्.टी.’चे आरक्षण चालू होणार आहे’, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाने दिली.
सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडीपर्यंत बनावट नोटांची साखळी !
आंतरराष्ट्रीय टोळीचे संबंध सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी गावापर्यंत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई येथील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुक्त चौकशीचे आदेश !
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात राज्य सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुक्त चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी त्यांच्यावर २ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता.
खासगी कामासाठी मंत्री नितीन राऊत यांनी सरकारी पैशांतून विमान प्रवास केला !
मुंबई उच्च न्यायालयाकडून उत्तराची विचारणा, प्रवासाचा व्यय ४० लाख रुपये झाल्याचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला १९ जुलैपर्यंत कोठडी !
पुणे येथील भूमी घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने १९ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.