राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्‍या जावयाला १९ जुलैपर्यंत कोठडी !

एकनाथ खडसे

मुंबई – पुणे येथील भूमी घोटाळा आणि आर्थिक गैरव्‍यवहार प्रकरणांत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्‍तवसुली संचालनालयाने १९ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. चौधरी यांना मागील आठवड्यात अटक केली होती.

वर्ष २०१६ मध्‍ये खडसे हे महसूलमंत्री असतांना पुण्‍यातील भोसरी येथील महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्‍या मालकीचा भूखंड गिरीश यांच्‍या नावे विकत घेण्‍यात आला होता. या प्रकरणी गुन्‍हा नोंद झाला होता.