उद्धव ठाकरे सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री !

१३ राज्यांमध्ये करण्यात आले सर्वेक्षण !  

नवी देहली – ‘प्रश्‍नम्’ या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीविषयी सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मुख्यमंत्री’ म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मत देऊ’ असे  सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी मत नोंदवले आहे.

या सर्वेक्षणात १३ राज्यांमधील सुमारे १७ सहस्र ५०० मतदारांना याविषयी त्यांचे मत विचारण्यात आलेे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ४४ टक्के मतांनी दुसर्‍या क्रमांकावर आहेत. तिसर्‍या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ५व्या, तर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी १०व्या क्रमांकावर आहेत.