बीड – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री करीना कपूर हिने ख्रिस्ती पंथियांच्या ‘बायबल’चे नाव ‘प्रेग्नसी बायबल’ या पुस्तकासाठी वापरल्यामुळे आक्षेप घेण्यात आला आहे. करीना कपूरच्या विरोधात ‘अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघा’च्या वतीने येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
Maharashtra: Christian group files complaint against Kareena Kapoor Khan for her book ‘Pregnancy Bible’ alleging blasphemyhttps://t.co/fGEaRu4lvy
— OpIndia.com (@OpIndia_com) July 14, 2021
‘करीना कपूरने स्वत:च्या पुस्तकावर ‘बायबल’ शब्द वापरून ख्रिस्ती पंथियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे पुस्तकाच्या नावातील ‘बायबल’ हा शब्द तात्काळ हटवावा’, अशी मागणी ‘ख्रिश्चन महासंघा’ने केली आहे. या तक्रारीविषयी अद्याप करीना कपूर किंवा पुस्तक प्रकाशक यांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही; मात्र ‘या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंद करावा’, अशी मागणी ‘ख्रिश्चन महासंघा’कडून करण्यात आली आहे.
सांगली – अभिनेत्री करीना कपूर हिच्या विरोधात ख्रिश्चन एकता मंच यांच्या वतीने सांगलीत १५ जुलै या दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.