भाजपचे समाधान अवताडे ३ सहस्र ५०३ मतांनी विजयी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने येथील विधानसभेची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे घेतलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव करत भाजपचे समाधान अवताडे ३ सहस्र ५०३ मतांनी विजयी झाले.

महाराष्ट्रदिनी राज्यातील २६ जिल्ह्यांत १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणाला प्रारंभ !

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज्यातील २६ जिल्ह्यांतील १३२ लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणाला प्रारंभ झाला. १ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ११ सहस्र ४९२ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली.

आता पाणी डोक्यावरून गेले आहे, आजच्या आज ऑक्सिजन पुरवा !

न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारतांना म्हटले की, आम्ही केंद्र सरकारला निर्देश देतो की, त्यांनी काहीही करून देहलीला आजच्या आज ४९० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवावा. त्यासाठीचे टँकर पुरवण्याचे दायित्वही केंद्राचेच आहे.

बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपच्या मंगला अंगडी विजयी

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार श्रीमती मंगला अंगडी यांनी काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्यावर २ सहस्र ९०३ मतांनी विजयी मिळवला आहे. खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी १७ एप्रिलला मतदान झाले होते.

बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय झाल्यानंतर काही ठिकाणी भाजपच्या कार्यालयांवर आक्रमणे करण्यात आली. एका ठिकाणच्या कार्यालयाला आगही लावण्यात आली, तर एका उमेदवारावर दगडफेक करण्यात आली. भाजपने याविषयी कारवाईची मागणी केली आहे.

देशात तात्काळ दळणवळण बंदी लावा !

सध्या आपण जशी अंशत: बंदी आणत आहोत, तशी नाही, तर देशव्यापी दळणवळण बंदी हवी; कारण कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशात वाढत आहे, असा सल्ला ‘कोविड टास्क फोर्स’च्या सदस्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

कोविड-१९, निवडणुका आणि कुंभमेळा !

देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार यांनी कुंभमेळा स्थगित करण्याविषयी संत-महंत यांना विनंती केली. त्याला सर्व साधू-संत आणि महंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

कोरोनाकाळात देवस्थानांनी केलेले साहाय्य आणि पुरोगाम्यांकडून केला जाणारा दुष्प्रचार !

‘आम्हाला मंदिर बांधण्याविषयी सांगितले गेले; मात्र रुग्णालय (हॉस्पिटल) बांधण्याविषयी कुणी काही चर्चा केली नाही’.अशा अपप्रचाराला अनेकदा सर्वसामान्य माणूस बळी पडतो; म्हणूनच सत्य दाखवण्यासाठी हा लेख येथे देत आहोत.

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक कार्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यापेक्षाही या प्रदीर्घ कालावधीत त्यांच्या विलक्षण आणि अद्वितीय कार्यपद्धतीविषयी माझ्या लक्षात आलेली काही गुणवैशिष्ट्ये मी येथे कृतज्ञतापूर्वक मांडत आहे.

साधकांना साधनाप्रवासात कुठेही अनुभूती वा सिद्धी यांमध्ये अडकू न देता लीलया सगुणातून निर्गुणाकडे नेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !