बेळगाव – बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार श्रीमती मंगला अंगडी यांनी काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांच्यावर २ सहस्र ९०३ मतांनी विजयी मिळवला आहे. खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी १७ एप्रिलला मतदान झाले होते. श्रीमती अंगडी यांना ४ लाख ३५ सहस्र २०२, तर जारकीहोळी यांना ४ लाख ३२ सहस्र २९९ मते पडली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांनी जोरदार मुसंडी मारत १ लाख २४ सहस्र २३५ मते मिळाली. शुभम शेळके यांच्या उमेदवारीने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.