परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तस्पर्शाने चैतन्यमय झालेल्या गुरुपादुकांचे आगमन होण्यापूर्वी आणि आगमन झाल्यानंतर साधकांना आलेल्या अनुभूती
‘मुंबई सेवाकेंद्रात गुरुपादुकांच्या पूजनाचा सोहळा आहे’, हे समजल्यापासूनच ‘मला पुष्कळ चैतन्य मिळत असून आनंदात वाढ झाली आहे’, असे मला जाणवले. माझे मन पुष्कळ उत्साही होऊन मी निर्विचार स्थिती अनुभवत होते.