पणजी – गोव्यात पुढील २ दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान १ ते २ डिग्री सेल्सियसने वाढणार आहे. सध्या गोव्यात कमाल तापमान ३३ डिग्री सेल्सियस आहे, अशी माहिती हवामान खात्याने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, मागील २४ घंट्यांत पणजी आणि मुरगाव तालुक्यांत अनुक्रमे सर्वाधिक ३३ आणि ३२.६ डिग्री सेल्सियस तापमान नोंद झाले आहे. राज्यातील किनारपट्टी क्षेत्रातील भागातील तापमानापेक्षा अन्य भागांतील तापमान अधिक असण्याची शक्यता आहे.’’