
सावंतवाडी – तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा येथील स्व. बाळासाहेब ज्ञानप्रबोधिनी येथे पार पडला. या वेळी पत्रकार संघाच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या पुरस्कारांचे वितरण माजी गृहराज्यमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याच्या प्रारंभी आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार’ युवा पत्रकार भूषण आरोसकर यांना, ‘कै. चंदु वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार वसंत उपाख्य अण्णा केसरकर यांना, ‘माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार’ राजेश मोंडकर यांना, ‘बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार’ छायाचित्रकार जतिन भिसे यांना, तर ‘जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांना प्रदान करण्यात आला.
या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँकेचे संचालक विकास सावंत, तहसीलदार राजाराम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, पत्रकार संतोष सावंत, हरिश्चंद्र पवार, तालुका पत्रकारसंघाचे अध्यक्ष विजय देसाई, खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना
शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा न करताच तानाजी पाटील यांचे उमेदवारी आवेदन !
मूल्याधिष्ठित पत्रकारिता देशाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळ घंटानाद आंदोलन करणार्या शिवसैनिकांवर गुन्हा नोंद !
ठाणे जिल्ह्यातील दुर्गाडी गड ‘दुसरी भोजशाळा’ !
विशाळगडावर मुसलमान सरदार रेहान मलिकच्या नावाने भरवला जाणार्या उरूसाला अनुमती नाकारा !