‘ओसीआय’ कार्डधारकांना तबलिगी किंवा मिशनरी यांसंदर्भात भारतात कार्य करायचे असल्यास अनुमती आवश्यक ! – केंद्र सरकारचा नवा नियम

नवी देहली – ओसीआय (ओव्हरसीज इंडियन – भारतीय वंशाचे विदेशातील नागरिक. त्यांना या कार्डद्वारे भारतात काही अधिकार दिले जातात.) कार्डधारक विदेशी नागरिकांना भारतात तबलिगी, मिशनरी अथवा पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करायचे असल्यास त्यांना ‘फॉरेन रिजनल रजिस्टे्रशन ऑफीस’कडून विशेष अनुमती घ्यावी लागणार असल्याचा नवा नियम केंद्र सरकारने केला आहे.

या कार्डधारकांना विदेशी प्रकल्पामध्ये  काम करायचे असेल किंवा प्रतिबंधित क्षेत्रात जायचे असेल, तेव्हाही त्यांना अनुमती घ्यावी लागणार आहे. निवासाच्या ठिकाणामध्ये पालट झाल्याचीही माहिती त्यांना द्यावी लागणार आहे.