जामिनावर सुटलेल्या बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीने पीडितेला पेटवले !

  • आरोपींवर जलद गतीने खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत, हे भारताला लज्जास्पद !
  • काँग्रेसच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

हनुमानगड (राजस्थान) – येथे बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका झाल्यावर त्याने पीडितेवर रॉकेल ओतून तिला पेटवले. यामध्ये पीडिता ९० टक्के भाजली आहे. तिला बीकानेरच्या सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.