लोकप्रतिनिधींना नियमांचे उल्लंघन करण्याचे भान न रहाणे हे लज्जास्पद आहे ! असे केल्यास सर्वसामान्य जनता नियमांचे पालन करेल का ? अशा मिरवणुकांतून कोरोना पसरल्यास त्याचे दायित्व हे लोकप्रतिनिधी घेणार का ? आपत्काळातही समाजभान नसणारे असे लोकप्रतिनिधी कामे तरी कशी करत असतील ?
उपसभापतींसह ७६ जणांवर गुन्हा नोंद
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राजश्री भोसले यांची निवड झाल्यानंतर तालुक्यातील ओझेवाडी येथे ३ मार्च या दिवशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपसभापती राजश्री भोसले, त्यांचे पती पंडित भोसले यांच्यासह मिरवणुकीत सहभागी झालेल्या ७६ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पंढरपूर तालुका पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत देशमुख यांनी त्यागपत्र दिल्यानंतर रिक्त पदी राजश्री भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष करून जे.सी.बी.चा वापर करत मिरवणूक काढली. मिरवणुकीत गुलालाची उधळण करत मास्क न लावता मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.