सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रकार
सातारा, ६ मार्च (वार्ता.) – ३ मार्च या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक धनंजय कुलकर्णी वाहनांची ब्रेक तपासणी (ब्रेक टेस्ट ड्राईव्ह) करत होते. या वेळी रिक्शाचा ब्रेक न लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन समोरील भिंतीवर जाऊन आदळले. यामध्ये कुलकर्णी गंभीर घायाळ झाले. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे दैनंदिन काम चालू असतांना हा अपघात घडला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.
त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून भविष्यात असा प्रकार घडू नये, यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात येईल, असेही विनोद चव्हाण यांनी सांगितले.
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखाना कोसळला; २ कामगार घायाळ