काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलन यांमुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे अनेक प्रांतात विद़्ध्वंस झाला आहे. पूर आणि भूस्खलन यांमुळे आतापर्यंत २२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण बेपत्ता आहेत.
सौजन्य:Firstpost
नेपाळ सैन्यदल आणि पोलीसदल यांना साहाय्यकार्यासाठी विविध भागांत पाठवण्यात आले आहे. पूरग्रस्तांना तात्काळ साहित्य पुरवले जात आहे. नेपाळच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते ऋषीराम तिवारी म्हणाले की, वाहतूक पुन्हा चालू करण्यासाठी महामार्ग मोकळे केले जात आहेत.