Nepal MP Demanded Probe On US Funding : नेपाळला ‘धर्मनिरेपक्ष राष्ट्र’ बनवण्यासाठी दिल्या गेलेल्या अमेरिकेच्या निधीची चौकशी करा !

नेपाळच्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे खासदार धवल शमशेर राणा यांनी संसदेत केली मागणी !

नेपाळच्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे खासदार धवल शमशेर राणा

काठमांडू (नेपाळ) – नेपाळचा घटनात्मक ‘हिंदु राष्ट्रा’चा दर्जा रहित करून त्याला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित करण्यामागील अमेरिकेच्या निधीची चौकशी करण्याची मागणी नेपाळच्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे खासदार धवल शमशेर राणा यांनी संसदेत केली. नेपाळला हिंदु राष्ट्र म्हणून नष्ट करण्यासाठी आणि धर्मांतरासाठी अमेरिकेकडून १० कोटी डॉलर्सचा (८६८ कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा) निधी उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. न्यायालयीन चौकशी करून दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

खासदार राणा म्हणाले की,

१. कोणत्या नेपाळी नेत्यांना अमेरिकी निधी मिळाला, याचे सत्य देश आणि जग यांसमोर आले पाहिजे.

२. नेपाळमधील सार्वजनिक चळवळीत कधीही हिंदु राष्ट्र संपवून ते धर्मनिरपेक्ष देश घोषित करण्याची मागणी करण्यात आली नाही.

३. देशातील राजेशाही संपल्यानंतर काही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी अंतरिम राज्यघटनेची घोषणा केली होती, ज्यामध्ये नेपाळला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित करण्यात आले होते.

४. नेपाळ हे जगातील एकमेव हिंदु राष्ट्र म्हणून ओळखले गेले आहे. त्यामुळे संसदेतून धर्मनिरपेक्षता नाकारून देशाला पुन्हा हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी होत आहे.

संपादकीय भूमिका

हा निधी केवळ अमेरिकेने दिला होता कि त्यात चीनचाही समावेश होता किंवा चीनचा नेपाळमध्ये किती हस्तक्षेप आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे !