पोलिसांनी अटक करून चेतावणी देऊन सोडले !

काठमांडू (नेपाळ) : नेपाळमध्ये हिंदूंना ख्रिस्ती करण्याचा प्रयत्न करणार्या १७ अमेरिकी आणि एका भारतीय नागरिकाला स्थानिक अधिकार्यांनी अटक केली आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना चेतावणी देऊन सोडून देण्यात आले. हे सर्व लोक पर्यटक म्हणून नेपाळमध्ये आले होते आणि सामाजिक कार्यकर्ते असल्याचे भासवून स्थानिक लोकांना ख्रिस्ती धर्मात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत होते.
अन्वेषण अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार गुन्ह्याची तीव्रता आणि पुढील कारवाई निश्चित करण्यासाठी अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकाख्रिस्ती मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असतांना आता संपूर्ण देशात हिंदूंनी धर्मांतरित झालेल्या हिंदूंना परत स्वधर्मात घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवणे आवश्यक आहे ! |