वेंगुर्ला येथील नगरवाचनालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

साहित्यिक, व्यासंगी वाचक पुरस्कार, विविध स्पर्धांचे आयोजन करून प्रत्यक्ष वाचन चळवळ बळकट करत आहेत, असे प्रतिपादन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त वीरधवल परब यांनी ग्रंथप्रदर्शनाच्या शुभारंभी केले.

कर्नाटकचा राजकीय दहशतवाद संपवावाच लागेल ! – शिवसेना

बेळगावसह सीमा भागातून मराठी भाषा, संस्कृतीच्या खुणा उखडून टाकण्याचा चंग कानडी सरकारने बांधला आहे. हा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद आहे. तो संपवावाच लागेल, अशी भूमिका शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून मांडली आहे.

काँग्रेस नेते शशी थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यासहित अनेक पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद

पोलिसांच्या गोळीबारात शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवल्याचे प्रकरण : केवळ गुन्हा नोंदवून पोलिसांनी थांबू नये, तर अशांना कारागृहात डांबावे आणि जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत !

१ ते ९ मार्च कालावधीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करणार आहेत. २९ जानेवारी या दिवशी मनसेची आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील लिंगराज मंदिराजवळील उत्खननात १० व्या शतकातील मंदिराचा भाग सापडला !

लिंगराज मंदिराजवळ पुरातत्व विभागाकडून करण्यात येत असलेल्या उत्खननातून १० व्या शतकातील एका मंदिराचा भाग आढळून आला आहे. यात एक शिवलिंगही सापडले आहे. पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे की, पंचायतन पद्धतीने या मंदिराचा परिसर बनवण्यात आला आहे.

६० वर्षे गुहेत ध्यान साधना करणार्‍या ऋषिकेश येथील संतांकडून श्रीराममंदिरासाठी एक कोटी रुपये दान !

येथील ८३ वर्षीय स्वामी शंकर दास यांनी श्रीरामंदिरासाठी १ कोटी रुपयांचे दान दिले आहे. स्वामी शंकर दास हे जवळपास ६० वर्ष ऋषिकेश येथील गुहेमध्ये ध्यान साधना करत आहेत.

एकदा जर उद्रेक झाला, तर थांबवणार कोण ?

मराठा आरक्षण प्रश्‍नी उदयनराजेंची चेतावणी

कचरावेचक महिलांना विनामूल्य चारचाकी प्रशिक्षण देणार ! – गीतांजली ढोपे-पाटील, सभापती, महिला आणि बालकल्याण

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात महिला स्वच्छतागृहे बांधण्याचा आमचा मनोदय आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण सभापती सौ. गीतांजली ढोपे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर-मिरज मार्गाचे दुहेरीकरण करा ! – संजय मंडलिक, खासदार, शिवसेना

मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण चालू आहे ,त्यामुळे कोल्हापूर मिरज मार्गाचे दुहेरीकरण आवश्यक आहे.

राममंदिर निर्माणासाठी पंकजा मुंडे यांनी दिला पाच लाख रुपये निधी 

प्रभु श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ५ लाख रुपयांचा निधी समर्पित केला आहे.