
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करणार आहेत. २९ जानेवारी या दिवशी मनसेची आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या दौर्याविषयी माहिती दिली.
बाळा नांदगावकर पुढे म्हणाले की, ९ मार्च या दिवशी मनसेचा ‘वर्धापनदिन’ असतो. अयोध्या दौर्याहून परतल्यानंतर राज ठाकरे पक्षाला संबोधित करतील. ९ मार्चनंतर राज ठाकरे राज्यातील विविध भागांचा दौरा करतील, तसेच मुंबई महापालिका निवडणूक जवळ आल्यामुळे ९ फेब्रुवारी ते १२ एप्रिलपर्यंत मनसे सदस्य नोंदणी करणार आहे.
‘मराठी भाषा’ दिनाला स्वाक्षरी मोहीम राबवणार !
बाळा नांदगावकर म्हणाले, ‘‘२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांची जयंती हा ‘मराठा राजभाषा’ दिवस म्हणून साजरा केला जातो. मनसे हा दिवस सण आणि उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे. यानिमित्ताने मराठी स्वाक्षरी मोहीम राबवली जाईल. त्या दिवशी मनसेच्या वतीने मराठी शिक्षक, संस्थाचालक, मराठी प्रकाशक, संपादक, कवी, लेखक, खेळाडू, मराठी वृत्तपत्रे, मराठी वृत्तवाहिन्या, नाट्य कलावंत आणि सिनेकलावंत यांचा सन्मानही करण्यात येणार आहे.’’
UP Poster Row : मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ‘हृदयात बाबर, मुखात राम’, असा फलक लावल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते संतप्त !
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर दान चोरी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि उत्तरप्रदेश सरकार यांना नोटीस
मराठी नामफलक न लावणार्या मुंबईतील ६ सहस्रांहून अधिक आस्थापनांवर कारवाई !
मराठी प्रवाशाला बळजोरीने अंधेरी येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात २ घंटे डांबले !
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासात काम करणार्या २३ कर्मचार्यांचे त्यागपत्र
Karnataka Temples CCTV : राज्यातील सर्व मंदिरांमध्ये ‘सीसीटीव्ही’ लावण्याचा मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा आदेश !