हरिद्वार (उत्तराखंड) – येथील ८३ वर्षीय स्वामी शंकर दास यांनी श्रीरामंदिरासाठी १ कोटी रुपयांचे दान दिले आहे. स्वामी शंकर दास हे जवळपास ६० वर्ष ऋषिकेश येथील गुहेमध्ये ध्यान साधना करत आहेत. स्वामींचे गुरु टाटावाले बाबा यांच्या गुहेत येणार्या श्रद्धाळूंकडून मिळालेल्या अर्पणातून त्यांनी एक कोटी रुपये जमवले, असे त्यांनी सांगितले. त्यांनी येथील स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन धनादेश दिला.
Seer who lived in caves for over six decades donates Rs 1 crore for Ram temple https://t.co/M1GtcSxqgc via @TOICitiesNews pic.twitter.com/pKDaBqtyGB
— The Times Of India (@timesofindia) January 29, 2021
स्वामी शंकर दास यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना गुप्त दान करण्याची इच्छा होती; परंतु मंदिर निर्माणासाठी अनेकांना प्रेरणा मिळावी, यासाठी दानाची रक्कम घोषित केली. स्वामी शंकर दास यांना स्थानिक लोक ‘फक्कड बाबा’ म्हणतात. लोकांनी दिलेल्या दान-दक्षिणेतूनच ते त्यांचा उदरनिर्वाह चालवतात.